छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या टीआरपीबद्दल बोलायचे तर तिथेही ही मालिका आघाडीवर आहे. या मालिकेत दया बेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani)ने साकारली होती. सध्या दिशा वकानी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करताना दिसत नाही. पण जोपर्यंत ती या शोचा भाग होती तोपर्यंत तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
दिशा वकानीने आपल्या साध्या स्टाईलने सर्वांना वेड लावले. पण आज आपण दिशा वकानीची धाकटी बहीण खुशालीबद्दल बोलणार आहोत. दिशा वकानीची धाकटी बहीण खुशाली ही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कदाचित तुमच्यापैकी फार कमी जणांना माहित असेल की खुशाली नाट्यविश्वात खूप प्रसिद्ध आहे.
दिशा वाकानी, खुशाली आणि मयूर यांना त्यांच्या वडिलांकडूनच अभिनयाचे बालकडू मिळाले, असे म्हणता येईल. खुशाली अनेक गुजराती शोमध्ये अभिनय करताना दिसली आहे. तसेच ती 'ब्लॅक' या बॉलिवूड चित्रपटातही दिसली आहे.