Join us

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील माधवी भाभीच्या खऱ्या मुलीला पाहिलं का?, सौंदर्यात सोनूलाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:39 IST

Sonalika Joshi : सोनालिका जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या लेकीसोबत अनेकदा व्हिडीओ बनवताना दिसते

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा(Taarak Mehta Ka Ulta Chashma). या मालिकेतील आत्माराम भिडे आणि माधवी भाभी यांची भूमिका खूप लोकप्रिय ठरली आहे. २००८ साली सुरू झालेल्या या मालिकेच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण मधल्या काळात वाद विवादामुळे काही कलाकारांनी या मालिकेला कायमचा निरोप दिला. पण अभिनेत्री सोनालिका जोशी (Sonalika Joshi) आणि मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) हे मराठी कलाकार अजूनही या मालिकेत काम करत आहेत. 

सोनालिका जोशी हिने मराठी नाटक, मालिकेतून काम केल्यानंतर हिंदी सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले आणि तिला यश देखील मिळाले. झुळूक, आकाश पेलताना, वारस सारेच सरस, गहिरे पाणी अशा चित्रपटातही ती सहाय्यक भूमिकेत झळकली आहे. पण गेली १६ वर्षे साकारत असलेल्या माधवी भिडे या पात्राने तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

सोनालिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या लेकीसोबत अनेकदा व्हिडीओ बनवताना दिसते. आर्या जोशी या तिच्या लेकीला गाण्याची आवड आहे. दोघी मायलेकी एकत्र गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते पाहून मालिकेतील माधवी भाभीची रिअल लाईफ मुलगी सुंदर दिसते अशा तिला प्रतिक्रिया मिळत आहेत. तिची तुलना सोनू भिडेशी करत खरीच मुलगी खूप छान आणि गोड आहे, असे नेटकरी सांगत आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवी भिडे यांच्या मुलीची भूमिका सध्या खुशी माळी साकारत आहे. याअगोदर ही भूमिका पलक सिधवानी हिने साकारली होती. पण या दोघीं पेक्षाही त्यांची खऱ्या आयुष्यातील मुलगी आर्या जोशी खूप सुंदर दिसते असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा