Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा आणि कुणालचा रोमँटीक अंदाज तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 13:12 IST

 छोट्या पड्यावरील देवों के देव महादेव मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी लवकरच आपल्या जीवनात नवी इनिंग सुरु ...

 छोट्या पड्यावरील देवों के देव महादेव मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी लवकरच आपल्या जीवनात नवी इनिंग सुरु करणार आहे. टीव्ही अभिनेता कुणाल वर्मासह पूजा रेशीमगाठीत अडकणार आहे. त्याआधी दोघांचा साखरपुडा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी पूजा आणि कुणाल यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता. यावेळी अदा खान, अनिता हसनंदानी, शशांक व्यास, पूजा गौंड आणि भारती सिंह आवर्जून उपस्थित होते. आपल्या खास मैत्रिणीला तिच्या नव्या आयुष्याच्या शुभारंभासाठी शुभेच्छा देण्यासाठी सारेच उपस्थित होते. यावेळी पूजा आणि कुणाल यांनी रोमँटिक डान्स सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. पूजाने यावेळी निळ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाचा लहेंगा परिधान केला होता. या आकर्षक ड्रेसिंगमुळे पूजाच्या सौंदर्याला आणखी चारचाँद लागले होते. या सोहळ्यात सा-यांनीच धम्माल मस्ती करत पूजाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण साजरा केला.या सोहळ्यानंतर लगेचच पूजा आणि कुणालने खास फोटोशूट केले. या फोटोत पूजाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.फोटोशूटमधले का खास फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत पूजा आणि  कुणालचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळतोय. या फोटोला त्यांच्या चाहत्यांकडूनही खूप सा-या लाईक्स आणि कमेंटस मिळत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.'तुझ संग प्रीत लगाई सजना' या मालिकेच्या सेटवर पूजा आणि कुणाल यांची पहिल्यांदा ओळख झाली. तेव्हापासून दोघं एकत्र आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांच्या नात्यात कटूता आली. त्यामुळेच दोघांमध्ये ब्रेकअपही झालं. मात्र आपल्यातील नात्याला त्यांनी पुन्हा बहरण्याची संधी या दोघांनी दिली आहे. आता आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्धार पूजा आणि कुणाल यांनी केला आहे.