Join us
Daily Top 2Weekly Top 5

​'छोटी मालकीण' या मालिकेतील अक्षर कोठारीचा लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 09:52 IST

आपल्या अभिनयाचा ठसा छोटा पडद्यावर उमटवलेला अभिनेता अक्षर कोठारी आता स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत दिसणार आहे. ...

आपल्या अभिनयाचा ठसा छोटा पडद्यावर उमटवलेला अभिनेता अक्षर कोठारी आता स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये प्रेक्षकांना त्याला पाहाता येणार आहे. या मालिकेत तो श्रीधर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आपल्या व्यक्तिरेखेवर नेहमीच मेहनत घेणाऱ्या अक्षरने 'छोटी मालकीण'साठीही खास मेहनत घेतली आहे.स्टार प्रवाहबरोबर अक्षर कोठारीचे जुने नाते आहे. त्याने स्टार प्रवाहच्याच 'हे बंध रेशमाचे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर 'आराधना' या मालिकेतही त्याने काम केले होते. या दोन्ही मालिकांनी त्याला उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. 'छोटी मालकीण' या मालिकेद्वारे अक्षर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर पुन्हा काम करायला मिळत असल्याने अक्षर सध्या चांगलाच खूश आहे. तोसांगतो,  "माझी प्रत्येक भूमिका वेगळी दिसावी यासाठी मी लुकवर विचार करतो, मेहनत घेतो. सुदैवाने आतापर्यंत माझ्या आजवरच्या मालिकांमधील लूक प्रेक्षकांना आवडले आहेत. 'छोटी मालकीण' मालिकेची कथा माझ्याकडे आली. त्यावेळी 'श्रीधर' ही व्यक्तिरेखा वाचल्यावर माझ्या मनात या व्यक्तिरेखेविषयी काही चित्र तयार झाले होते. त्यात या श्रीधरला पिळदार मिशी असावी असे मला सतत वाटत होते. हा 'श्रीधर' छोट्या शहरातला तरूण आहे. मीही सोलापुरसारख्या शहरातला असल्याने श्रीधरच्या मानसिकतेचा नेमक्या पद्धतीने विचार करू शकलो. त्यामुळे मी मिशी पिळदार होण्यासाठी प्रयत्न केले. माझा लुक पाहिल्यावर श्रीधरला पिळदार मिशी असावी ही माझी कल्पना स्टार प्रवाहनेही मान्य केली. स्टार प्रवाहने अभिनेता म्हणून मला पहिली संधी दिली होती. त्यामुळे माझे आणि स्टार प्रवाहचे नाते खूप आपलेपणाचे आहे. 'छोटी मालकीण' या मालिकेच्या निमित्ताने मला घरी परत आल्यासारखे वाटतेय. माझ्या आधीच्या 'हे बंध रेशमाचे' आणि 'आराधना' या मालिकांप्रमाणे याही मालिकेवर प्रेक्षक नक्कीच प्रेम करतील याची मला खात्री आहे." अक्षरची 'छोटी मालकीण' ही मालिका १९ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.Also Read : ​अक्षर कोठारी दिसणार छोटी मालकीण या मालिकेत