Join us

भगवान शंकराच्या रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'आई कुठे काय करते 'मध्ये करतीये काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 18:10 IST

Marathi actress: या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संपूर्ण देशात सध्या महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यात कलाकार मंडळीदेखील मागे नाहीत. अनेकांनी सोशल मीडियावर विविध रिल्स, फोटो शेअर करत महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्येच एका लोकप्रिय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा भगवान शंकराच्या रुपातील फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सध्या एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीने भगवान शंकराच्या रुपातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत असून तिने केलेल्या मेकअपमुळे तिला ओळखणं कठीण झालं आहे. अनेक जण ही अभिनेत्री नेमकी कोण? याचा शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर भगवान शंकराच्या रुपात मेकअप करणारी ही अभिनेत्री सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

दरम्यान, फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अश्विनी महांगडे आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. अश्विनीने अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत असते.

टॅग्स :अश्विनी महांगडेटिव्ही कलाकारसेलिब्रिटीआई कुठे काय करते मालिका