Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या कडेवर असलेल्या या क्युट मुलीला ओळखलंत का ? आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:49 IST

फोटोत बाबांच्या कडेवर असलेली ही क्युट अभिनेत्री आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात.  दरम्यान मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोया. फोटोत बाबांच्या कडेवर असलेली  ही क्युट अभिनेत्री आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून अरुंधतीची मुलगी ईशा आहे अर्थात अभिनेत्री अपूर्वा गोरे. 'आई कुठे काय करते' मालिकेत अपूर्वा अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारते आहे. अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेत साधी सरळ ईशा अर्थातच अपूर्वा रिअल लाईफमध्ये फारच ग्लॅमरस आहे. ति तिची फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकवेळा तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे ही अपूर्वा चर्चेत असते. 

सोशल मीडियावर अपूवार्चा चाहता वर्ग मोठा असून तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात. अपूर्वाने हिंदी मालिकेतसुद्धा काम केलं आहे. ती नुकतीच ‘वागळे की दुनिया’या प्रसिद्ध हिंदी मालिकेत झळकली आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार