Join us

पाठमोरी बसलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 17:35 IST

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये फोटोमध्ये ती खडकांवर बसून अथांग समुद्र पाहात आहे.

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींचे अपडेटही ते नेटकऱ्यांना देतात. यात बऱ्याचदा ही कलाकार मंडळी त्यांचे फोटोशूट,व्हेकेशन याचे फोटो शेअर करतात. सध्या मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

'स्वप्नांच्या पलिकडले' या गाजलेल्या मालिकेतील पावनी साऱ्यांनाच आठवत असेल. पावनीची ही भूमिका अभिनेत्री गौरी नलावडे (gauri nalawde) हिने साकारली होती. याच गौरीने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर केले आहे. अलिकडेच गौरीने मरीन ड्राइव्हसह मुंबई दर्शन केलं. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

गौरीने समुद्रकिनारी बसून काही फोटो क्लिक केले आहेत. यात तिने काही वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. यात एका फोटोमध्ये ती खडकांवर बसून अथांग समुद्र पाहात आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. दरम्यान, गौरी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिने कान्हा, फ्रेंड्स व फॅमिली कट्टा, गोदावरी या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :गौरी नलावडेसेलिब्रिटीटेलिव्हिजन