Join us

शिवाली, बिवाली की पावली? भुताच्या गेटअपमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:48 IST

Marathi actress: सध्या सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी वाट्टेल ते करतात. त्यामुळेच या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात राहतो आणि ही कलाकार मंडळी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होतात. यामध्येच सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक अभिनेत्री चर्चेत येत आहे. 

सध्या सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती भूताच्या गेटअपमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे ही अभिनेत्री नेमकी कोण हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.महाराष्ट्राची हास्यजत्रामधील शिवाली, भिवाली, पावली आणि अवली या चौघांच्या जोडीला विशेष प्रेम मिळतं. विशेष म्हणजे या तिघांपैकीच एक ही अभिनेत्री असल्याचं सांगण्यात येत आहे.

या कार्यक्रमातील शिवाली परब साऱ्यांनाच ठावूक आहे. शिवाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. म्हणूनच ती कायम तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो त्याच शिवालीचा आहे. शिवालीने तिच्या सोशल मीडियावर हा भूताच्या गेटअपमधील फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, तिच्या या फोटोवर सध्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. शिवाली मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राव्यतिरिक्त तिने मराठी सिनेमातही काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन