Join us

हाच का तो? देवमाणूसमधील डॉ. अजित कुमार, अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 13:22 IST

ऑन-स्क्रीन अजितकुमारची भूमिका साकारणारा किरण खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

देवमाणूस या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात कंगणी बाबा - नटवर सिंगच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला. किरण गायकवाड हि भूमिका अगदी चोख बजावतोय. सध्या मालिकेचं कथानक हे एका रंजक वळणावर आलं आहे. किरणच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांनी मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला देखील अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. अभिनेता किरण गायकवाड हा सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.

ऑन-स्क्रीन अजितकुमारची भूमिका साकारणारा किरण खऱ्या आयुष्यात खूपच जास्त स्टायलिश आहे. वेगवेगळ्या आउटफिटमधील फोटोज किरण नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतंच त्याने एका अनोख्या आऊटफिटमधील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. काहींनी कंगणी बाबाच्या स्टाईल फंडाचा कौतुक केलं तर काहींनी चक्क भूलभुलैया मधील कार्तिक आर्यनची उपमा किरणला दिली आहे. कंगना बाबांचा हा स्टाईल फंडा व्हायरल होताना दिसतोय.

, 'देवमाणूस' आणि 'देवमाणूस 2' या मालिकेमध्ये अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत झळकला आहे. किरण गायकवाडने २०१७ साली ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैयासाहेबची भूमिका साकारली होती. त्यानंतर २०२० मध्ये देवमाणूस मालिकेत किरणला अजितकुमार देवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतील त्याची नकारात्मक भूमिका तुफान गाजली. 

टॅग्स :किरण गायकवाड'देवमाणूस २' मालिका