Join us

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत होणार या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:39 IST

'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या नव्या मालिकेची चर्चा आहे. आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यात सध्या 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या नव्या मालिकेची चर्चा आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) आणि अभिजीत खांडकेकर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या मालिकेविषयी अनेक अपडेट चाहत्यांना मालिकेच्या टीमकडून दिले जात आहेत. आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत अभिजीत खांडकेकर एका गायकाची भूमिका साकारणार आहे. तर, उर्मिलाने वैदेही ही भूमिका साकारली आहे. सोबतच बालकलाकार अन्वी तायवडे हिने स्वरा ही भूमिका साकारली आहे. आता या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठेची एंट्री होणार आहे. प्रिया मराठे या मालिकेत निगेटीव्ह भूमिका साकारणार आहे. प्रियाने या मालिकेचा प्रोमो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, या मालिकेत प्रिया मराठेच्या एंट्रीमुळे एकंदरीतच या मालिकेत अनेक रंजक भाग पाहायला मिळणार याची खात्री प्रेक्षकांना दिवसेंदिवस होत आहे. तसेच प्रियाशिवाय या मालिकेत 'मी होणार सुपरस्टार' या रिअॅलिटी शोची सूत्रसंचालक स्वरा जोशीची देखील एन्ट्री होणार आहे. या मालिकेत ती स्वराच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारणार आहे.

प्रियाने तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.

 

टॅग्स :प्रिया मराठेस्टार प्रवाह