Join us

एक हजारों में मेरी बहना है ! 'आई कुठे काय करते'मधील यशची बहीण आहे प्रचंड ग्लॅमरस, तीसुद्धा आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 12:37 IST

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात हे अभिनेता-अभिनेत्री एकमेकांचे सख्खे भाऊ बहिणी आहेत ते फारसं कुणाला ठाऊक नाहीत. यापैकीच एक जोडी आहे. आई कुठे काय करतो (Aai kuthe kay karte) मधील यश आणि त्याच्या बहिणीची. यश म्हणजेच अभिषेक देशमुख प्रमाणेच त्याची बहीण सुद्धा अभिनय करते. आई कुठे काय करते मालिकेत यशचं ईशाशी जितकं घट्ट नातं आहे. तेवढंच स्पेशल बॉन्डिंग तो आपल्या खऱ्या आयुष्यातील बहिणीसोबत शेअर करतो. चला तर जाणून घेऊया यशची बहिण नक्की कोण आहे.

अभिषेक देशमुखच्या बहीणचं नाव अभिनेत्री अमृता देशमुख आहे. छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली.'तुमचं आमचं सेम असतं'या मालिकेत अमृता दिसली होती.अमृताने स्वीटी सातारकर सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. अमृता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफोइलवर नजर टाकली तर लक्षात येतं की ती खूपच ग्लॅमरस आहे. अमृता आणि अभिषेक एकमेकांसोबतचे फोटो  नेहमी पोस्ट करत असतात. फोटोंमध्ये बहीण-भावामधले बॉन्डिग दिसून येतं.

अभिनेता अभिषेक देशमुखने या मालिकेआधी पसंत आहे मुलगी या मालिकेत काम केले होते. यात त्याने साकारलेली पुनर्वसूची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.याशिवाय तो होम स्वीट होम या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. याशिवाय १५ ऑगस्टमध्येही त्याने काम केले आहे. या व्यतिरिक्त अभिषेकने वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार