सपना चौधरीला सेफ सेक्सविषयी खरंच माहिती नाही काय? हिना अन् शिल्पाच्या तोंडून कंडोम शब्द ऐकताच असे केले रिअॅक्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 15:48 IST
यंदाच्या बिग बॉसच्या सीजनमध्ये असे काही स्पर्धक सहभागी झाले आहेत, ज्यांना बाहेर आल्यानंतर सेक्स एज्युकेशनची प्रचंड गरज आहे. ज्योती ...
सपना चौधरीला सेफ सेक्सविषयी खरंच माहिती नाही काय? हिना अन् शिल्पाच्या तोंडून कंडोम शब्द ऐकताच असे केले रिअॅक्ट!
यंदाच्या बिग बॉसच्या सीजनमध्ये असे काही स्पर्धक सहभागी झाले आहेत, ज्यांना बाहेर आल्यानंतर सेक्स एज्युकेशनची प्रचंड गरज आहे. ज्योती कुमारी वयाने लहान असल्याने अन् बिहारमधील एका छोट्याशा गावातून ती आली असल्याने तिने सेक्सविषयी प्रश्न विचारणे स्वाभाविक होते. परंतु सपना चौधरीने सेक्सविषयी प्रश्न विचारणे हे जरा अतीच होते. विशेष म्हणजे सपनाला कंडोमविषयी माहिती नसल्याचे ती म्हणत असल्याने ती घरात ड्रामा तर करीत नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. गेल्या शोच्या फुटेजमध्ये हिना खान आणि शिल्पा शिंदे सपनाला सेफ सेक्सविषयी ज्ञान देताना बघावयास मिळाल्या. मात्र, शिल्पा आणि हिनाला तेव्हा धक्का बसला जेव्हा सपनाने म्हटले की, ‘मला कंडोमविषयी माहिती नाही.’ मग काय या विषयाची सुरुवात करणाºया हिनाने तिला कंडोमचा वापर कसा करतात अन् एका रिलेशनशिपमध्ये सेफ सेक्सकरिता कंडोम किती फायदेशीर आहे याबाबतचा उपदेशच दिला. या चर्चेदरम्यान एक गोष्ट पुढे आली, ती म्हणजे सपनाला हे माहितीच नव्हते की, कंडोमचा वापर केवळ पुरुषच नाही तर महिलाही करू शकतात. सपना हिनाला हेदेखील विचारते की, कंडोम कसे लावले जाते. मात्र सपनाच्या या प्रश्नावर हिना काहीही उत्तर देऊ शकत नाही. मात्र, शिल्पाला सपनाचे हे प्रश्न जास्तच बालिश वाटल्याने तिने तिला म्हटले की, ‘तू किती वर्षांची आहेस? आणि कुठे राहतेस? यावर सपना म्हणते की, ‘मी दिल्लीत माझ्या परिवारापासून वेगळी राहाते. पुढे शिल्पा तिला म्हणते की, तू या विषयावरील पुस्तके वाचत नाहीस काय? तर सपना म्हणते, मला कार्टून बुक्स वाचायला आवडतात. पुढे सपना हिनाला म्हणते की, ‘या घरात येऊन मला खूप काही शिकायला मिळाले.’ यावेळी हिना सपनाला सल्ला देते की, घरात तिने कंडोमसारख्या शब्दांचा प्रयोग करू नये. मात्र, प्रश्न हा निर्माण होतो की, सपनाला खरंच कंडोमविषयी माहिती नाही काय? ती घरात भोळी बनण्याचे नाटक तर करीत नसावी ना?