Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागार्जुनच्या टीमला झालेय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 12:08 IST

नागार्जुन एक योद्धा ही मालिका सासू-सूनेच्या मालिकांपेक्षा वेगळी असल्याने ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडेल असे निर्मात्यांना वाटत होते. त्यामुळे ...

नागार्जुन एक योद्धा ही मालिका सासू-सूनेच्या मालिकांपेक्षा वेगळी असल्याने ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडेल असे निर्मात्यांना वाटत होते. त्यामुळे या मालिकेचे धुमधडाक्यात लाँच करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी नवाब शाह यांनी ही मालिका सोडली आणि आता या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे निकितीन धीर आणि सुदीपा सिंग, पूजा बॅनर्जी हे या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेबाबत खूश नाहीत असे म्हटले जात आहे. पण निकितीन आणि सुदिपा यांनी त्यांना काहीही समस्या नसून या सगळ्या केवळ अफवा आहेत असे म्हटले आहे. पण पूजा तिच्या भूमिकेच्याबाबतीत समाधानी नाहीये. सध्या याबाबत तिची निर्मात्यांशी चर्चा सुरू असून या चर्चेनंतरच ती मालिकेविषयी निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे.