Join us

सीआयडी बंद झाली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 14:45 IST

सीआयडी ही मालिका सोनी या वाहिनीवर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. गेल्या महिन्याभरापासून या ...

सीआयडी ही मालिका सोनी या वाहिनीवर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. गेल्या महिन्याभरापासून या मालिकेचे नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीयेत. त्यामुळे ही मालिका बंद झाली आहे का अशी सगळ्यांनाच शंका आहे. पण ही मालिका ही बंद झाली नसून काही दिवसांचा ब्रेक घेण्यात आला आहे आणि ही मालिका लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.