Join us  

१० वर्षांत इतकी बदलली कृष्णाची भूमिका साकारणारी बालकलाकार, ओळखणं झालं कठीण:See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 5:46 PM

बालकृष्णाच्या भूमिकेतून ही बालकलाकार झाली होती प्रसिद्ध

छोट्या पडद्यावर बऱ्याच बालकलाकारांनी भगवान कृष्णाची भूमिका साकारली आहे. काही बालकलाकारांनी कृष्णाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यातील काहींची आठवण प्रेक्षक काढताना दिसतात. अशीच एका कृष्णाची भूमिका एका छोट्या मुलीनं साकारली होती. तिची निरागसता व नटखट अदांनी लोक मंत्रमुग्ध झाले होते. या मुलीचं नाव आहे धृती भाटिया. दहा वर्षांत ती इतकी बदलली आहे की ती ओळखताही येत नाही. 

धृतीने 'जय श्री कृष्ण' मालिकेत भगवान बालपणीच्या कृष्णाची भूमिका साकारली होती. मोठे केस व चेहऱ्यावरील निरागता व स्मितहास्यामुळे प्रेक्षकांची आवडती बालकृष्ण बनली. धृतीने ज्यावेळी ही भूमिका साकारली तेव्हा ती फक्त तीन वर्षांची होती.

 तीन वर्षांची असतानाच धृती बालकृष्णाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झाली होती. ही मालिका रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांनी बनवली होती. या मालिकेनंतर धृती बऱ्याच मालिकेत पहायला मिळाली. ती बरूण सोबतीसोबत 'इस प्यार को क्या नाम दूं' व  'माता की चौकी' या मालिकेत झळकली होती. 

धृती आता १४ वर्षांची झाली असून तिच्यात आता खूप बदल झाला आहे. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आताही कायम आहे.

सध्या तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.

धृतीने इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही  फोटोंमध्ये ती मस्ती करताना दिसते आहे. तसेच तिचे काही कलाकारांसोबतही आहेत.

या कलाकारांमध्ये प्रसिद्ध कोरियोग्राफर शामक दावर व जॅकी श्रॉफचा समावेश आहे.

टॅग्स :जन्माष्टमीसोशल मीडियादहीहंडीटिव्ही कलाकारइन्स्टाग्राम