Join us

धीरज-विनी अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 12:18 IST

धीरज धोपर आणि विनी अरोरा यांची पहिली भेट माता पिता के चरणो में स्वर्ग या मालिकेच्या सेटवर झाली. या ...

धीरज धोपर आणि विनी अरोरा यांची पहिली भेट माता पिता के चरणो में स्वर्ग या मालिकेच्या सेटवर झाली. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता दोघे लवकरच लग्न करणार आहेत. धीरज सध्या ससुराल सिमर का या मालिकेत तर विनी उडाण या मालिकेत काम करत आहे. 16 नोव्हेंबरला ते दोघे दिल्लीत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी धीरज म्हणाला, लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाहीये. पण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही लग्न करण्याचा विचार करत आहोत. लग्नासाठी मी चित्रीकरणातून दहा दिवसांचा ब्रेक घेणार असल्याचेही धीरज सांगतो.