Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या मंचावर आले धर्मेश सरांचे वडील, पुन्हा एकदा आठवणी झाल्या ताज्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 14:43 IST

'धर्मेश सर' नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे. रिअ‍ॅलिटी शोमधला स्पर्धक ते परिक्षक बनण्यापर्यंतचा संघर्ष अनुभवत आज इथपर्यंत पोहचला आहे.   

नृत्यविश्वातलं एक प्रख्यात नाव म्हणजे 'धर्मेश सर'. आपल्या नृत्यानं धर्मेश एका रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधी मागं वळून पाहिलं नाही. चित्रपट, डान्स शोज करतकरत आज 'धर्मेश सर' नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे. रिअ‍ॅलिटी शोमधला स्पर्धक ते परिक्षक बनण्यापर्यंतचा संघर्ष अनुभवत आज इथपर्यंत पोहचला आहे.   

डान्सचा टॉप गियर धर्मेश सर म्हणजे सर्व नृत्यप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहेत. खूप मेहनत करून आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर धर्मेश  सरांनी यशाची शिखरं गाठली. त्यांच्या या यशात त्यांना पहिल्या पावलापासून साथ दिली ती त्यांच्या वडिलांनी. त्याचे वडील हे त्यांचे खरे आदर्श आहेत. या आठवड्यातल्या 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या भागाची थीम आहे पहिला अनुभव. 

स्पर्धक प्रथमेश आणि त्याचा गुरू आकाश यांनी धर्मेश सरांचा पहिला इंटरव्ह्यू आणि त्यांचा एकंदरीत प्रवास दाखवला आहे. त्यात त्यांना त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा पाठिंबा कशा प्रकारे दिला आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा घडत गेला, हे नृत्यातून दाखवलं आहे. या सादरीकरणाच्या शेवटी धर्मेश सरांचे वडील मंचावर आले आणि त्यांना पाहून धर्मेश सर भावुक झाले. धर्मेश सरांसाठी हे एक सरप्राईज होतं. आपल्या मुलाची प्रगती बघून आणि त्याला परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला पाहून त्याचे वडील खूप खूश होते. त्यांच्या वडिलांनी हेही सांगितलं की, त्यांची फार इच्छा होती की धर्मेश सरांनी एखाद्या मराठी कार्यक्रमाचं परीक्षण करावं. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे आणि यासाठी आभार मानले.