Join us

धनश्री काडगावकरचा मेकओव्हर! अभिनेत्रीने केला 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीसारखा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 14:56 IST

अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे.

कधी छोट्या पडद्यावर वहिनीसाहेब तर कधी शिल्पीच्या भूमिकेतून अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या भूमिकेतून तिने घराघरात लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने मेकओव्हर केला आहे. तिने तिचे हेअर शॉर्ट केले आहेत. शॉर्ट हेअरमधला व्हिडीओ शेअर करत तिने स्वतःची तुलना कुछ कुछ होता हैमधील अंजलीशी केली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने इंस्टाग्रामवर शॉर्ट हेअर मधील व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, अंजली वाइब. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. 

धनश्री काडगावकर सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोंशिवाय जिममधील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. तिच्या या पोस्टला देखील चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर धनश्री २०१० साली 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यानंतर तिने कलर्स मराठीवर 'फुलाला सुगंध मातीचा' ही पहिलीवहिली मालिका केली. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती.शेवटची ती तू चाल पुढं मालिकेत शिल्पीच्या भूमिकेत दिसली होती. तिची ही भूमिका ग्रे शेड होती. तिला तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेबांच्या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

टॅग्स :धनश्री काडगावकरतुझ्यात जीव रंगला