Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:13 IST

वारीत सहभागी झाल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना धनंजय पोवारचं स्पष्ट उत्तर, म्हणाला…

Dhananjay Powar Troll On Aashadhi Wari: पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन 'याची देही याची डोळा घेणे' म्हणजे वारी.  कित्येक पावलं विठ्ठल भेटीच्या ओढीनं पंढरीकडे कूच करत आहेत.  'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात झळकलेला प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारही (Dhananjay Powar) यंदाच्या वर्षी वारीत सहभागी झालेला. पण, धनंजय पोवार यामुळे चांगलाच ट्रोल झाला आहे.  "मटण खाणारे वारीला आलेत" असं म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. पण, या ट्रोलिंगवर धनंजय पोवारनंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.  

धनंजय पोवार याने संत तुकाराम महाराजाच्या अभंग गाथेतील अभंग क्र.११३५चा अर्थ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय.  यासोबत धनंजय पोवारनं लिहलं, "श्रद्धा मनापासून असावी दिखाव्यासाठी नाही". तसेच आणखी एक फोटो शेअर करत "लावायची तेवढी ताकत लावा तुम्ही... भक्ती आणि भाव कभी नाही करू शकत" या शब्दात ट्रोलर्संना सुनावलं. 

धनंजय पोवार शेअर केला अभंग क्र.११३५चा अर्थ:

"भक्त उच्च जातीचा आहे की नीच जातीचा आहे हे काहीही भगवंत पाहत नाही, तर त्याची शुद्ध भक्तिभाव पाहूनच देव त्याचे कार्य करण्यास तत्पर असतो. विदुर दासीपुत्र आहे तरी देवाने त्याच्या घरी कण्या खाल्ल्या आणि दैत्याच्या म्हणजे हिरण्यकश्यपूचा घरी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. रोहिदासांच्या मागे कातडे रंगू लागला तर कबीरांच्या मागे शैले विनवू लागला. सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला तर सावतामाळी बरोबर त्यांचा मळा खुरपु लागतो".

 

"नरहरी सोनार यांच्याबरोबर भट्टी फुकून सोने घडू लागला तर चोखा महारा बरोबर त्यांची मेलेली ढोरे ओढू लागला. नामदेवांची दासी जनी हिच्याबरोबर गौर्‍या वेचु लागला .आणि धर्मराजाच्या घरी पाणी वाहून त्याची घरे झाडली ,नामदेवां सोबत जेवण्यासाठी देवाने कोणताही संकोच धरला नाही आणि ज्ञानदेवा साठी याने भिंत चालवली. अर्जुनाच्या रथावर हा देव सारथी म्हणून स्वार झाला आणि गरीब सुदाम्याचे पोहे याने आवडीने सेवन केले .नंदराजाच्या घरी याने गायी वळल्या आणि बळीराजाच्या दाराचा हा भगवंत द्वारपाल झाला".

 एकनाथांच्या घरी भक्तीचे ऋण फेडण्या करिता त्याने गंगेचे पाणी कावडीने आणले आणि अंबरीश राजासाठी देवाने दहा गर्भवास सोसिले. ज्यावेळी मिराबाईला विष दिले गेले त्यावेळी तिला जगविण्यासाठी देवाने स्वतःला ते विष प्राशन केले आणि दामाजीपंतांच्या हुंडीची भरपाई करण्याकरता देवच पाडेवार झाला. गोरोबाकाकांच्या बरोबर गाडगे तयार करू लागला आणि त्यासाठी डोक्यावर मातीही वाहू लागला आणि नरहरी मेहत्याची हुंडी देवाने स्वतः भरली. तुकाराम महाराज म्हणतात भक्त पुंडलिकासाठी हा देव अजूनही तिष्ठत उभा आहे ही त्याची कथा धन्य आहे"

टॅग्स :सेलिब्रिटीपंढरपूर वारीपंढरपूरसंत तुकाराम