Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दिया और बाती' फेम अनस रशिदला भोभोची खटकली ही गोष्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 13:22 IST

शशी सुमित प्रोडक्शनची लोकप्रिय ठरलेली दिया और बाती हम मालिका बंद झाली तेव्हापासूनच मालिकेचा सिक्वेल येण्याची चर्चा रंगू लागली ...

शशी सुमित प्रोडक्शनची लोकप्रिय ठरलेली दिया और बाती हम मालिका बंद झाली तेव्हापासूनच मालिकेचा सिक्वेल येण्याची चर्चा रंगू लागली होती. त्याचवेळी अनस रशिद साकारत असलेला सुरज राठीही भूमिका सिक्वेलमध्ये कायम राहणार का?असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी याविषयी माझी बोलणी सुरू आहेत.त्यामुळे ही व्यक्तिरेखा कदाचित माझ्याच वाट्याला येणार असेही त्याने सांगितले होते. मात्र   'तू सुरज मैं सांझ पियाजी'सिक्वेलमध्ये अनस रशिदला घेण्यात आले नसल्यामुळे त्याने यांवर नाराजी दर्शवली आहे.  अनसने सध्या  त्याच्या  कामातून ब्रेक घेतला आहे. काही दिवस तो  पंजाबमध्ये  कुटुंबियांसह निवांत वेळ घालवतोय. आमच्याशी चर्चा करताना अनसने सांगितले, “मालिकेच्या पुढील सिक्वेलचे प्रोमो मी पाहिले असून ते मला फारच आवडले.पडद्यावर भाभो दिसताच मला तिला जाऊन भेटायची इच्छा झालीय. नक्कीच मी तिला लवकर भेटायलाही जाणार आहे.मात्र भाभालो टीव्हीवप जेव्हा मी प्रोमोमध्ये पाहिले तेव्हा मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे  भाभोला खूपच म्हातारपणाची व्यक्तिरेखा देण्यात आली,असे करायला नको होते. या नव्या मालिकेत मी नसेन, याची मला तीव्र खंत तर वाटतेय. मात्र प्रोडक्शन टीमचा तो निर्णय असल्यामुळे काहीह करू शकत नाहीय. माझे सगळे सहकलाकार माझ्या कुटुंबाचाच एक भाग बनले होते. आजही मी त्यांच्याकडे माझे कुटुंबीय म्हणूनच बघतो. माझ्या त्यांना शुभेच्छा; मी त्यांना खूप मिस करतोय.  या प्रोमोबद्दल त्याने भाभोशी चर्चा केली होती का, असे विचारल्यावर अनास म्हणाला, “त्याबद्दल माझं तिच्याशी बोलणं झालेलं नाही, पण मी भेटून तिला याविषयी सांगणार आहे.या प्रोमोसाठी ती केरळला गेली होती, तेव्हा माझी तिच्याशी चर्चा झाली होती.” तू आता नवी मालिका पाहणार की नाही, असे विचारता तो म्हणाला, “नक्कीच बघीन- आणि हेही बघीन की ते जलेबी योग्य तर्‍्हेने करताहेत की नाही!”