Devoleena Bhattacharjee Kamakhya Temple Visit: 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत 'गोपी बहू'ची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली. सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती पती आणि मुलासोबत वेळ घालतवेय. छोट्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडिया आणि व्लॉगद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. अलीकडेच तिनं गुवाहाटीतील कामाख्या देवीचं (Kamakhya Devi) दर्शन घेतलं.
कामाख्या देवीचं मंदिर हे देशभरात प्रसिद्ध आहे. आसामच्या गुवाहाटीत वसलेलं हे मंदिर १०८ शक्तीपीठांपैकी एक आहे. देवोलीना ही पती आणि मुलासोबत कामाख्या देवीच्या चरणी नतमस्तक झाली. सोशल मीडियावर तिनं काही फोटो पोस्ट केले आहेत. यासोबत तिनं खास अनुभवही चाहत्यांशी शेअर केला आहे.
देवोलीनानं लिहलं, "शक्तीपीठावर आईचे आशीर्वाद मिळाले. कामाख्या मंदिरात एक दिव्य दिवस, जिथे प्रत्येक पावलावर श्रद्धा, मातृत्व आणि आईचे प्रेम मिळतं. भारतातील सर्वात शक्तिशाली मंदिरांपैकी एक असलेल्या माँ कामाख्या देवीचं दर्शन कुटुंबासह घेता आलं, याबद्दल कृतज्ञ आहे".
देवोलीना काळ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत अतिशय साध्या व सुंदर लूकमध्ये दिसत होती. कपाळावर टिळक, ओठांवर हसू दिसलं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी तिच्या साधेपणाचं आणि श्रद्धेचं कौतुक केलं.यापूर्वी, देवोलीनाने पती आणि मुलासह शिव मंदिरालाही भेट दिली होती. देवोलीना हिचा पती मुस्लिम आहे. तिनं २०२२ मध्ये तने शाहनवाज शेखशी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. या लग्नामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.