Devoleena Bhattacharjee : 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली. टेलिव्हिजनवर 'गोपी बहू' म्हणून या नावाने ती आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा भलामोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो. ती आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. राष्ट्रीय मुद्द्यांवर उघडपणे भाष्य करणाऱ्या देवोलीनाने आता जेएनयूचे माजी विद्यार्थी कार्यकर्ते उमर खालिद आणि शरजिल इमाम यांना पाठिंबा देणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. "भारत अशा देशद्रोहींनी भरलेला आहे" अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.
५ जानेवारी २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद आणि शरजिल इमाम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीत उमर खालीद आणि शरजिल इमाम यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते, या निष्कर्षावर येत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. या दोघांच्या जामीन अर्जावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी उमर खालिद आणि शरजिल इमाम यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या. याच समर्थकांवर देवोलीनानं टीका केली आहे.
देवोलीनाने तिच्या 'X' (ट्विटर) हँडलवर शरजिल इमामचा एक जुना वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "खरोखर, भारत अशा देशद्रोहींच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्या देशद्रोहींनी भरलेला आहे. शिक्षित असूनही लोक त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीवर मात करू शकत नाहीत".
देवोलीनाने २०२२ मध्ये तिचा जिम ट्रेनर शाहनवाज शेख याच्याशी लग्न केले होतं. ज्यानंतर तिला अनेकदा ट्रोल केले जाते. अलीकडेच तिच्या मुलाच्या त्वचेच्या रंगावरूनही तिला ट्रोल करण्यात आले होते. मात्र, देवोलीना प्रत्येक वेळी ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करत असते.
Web Summary : Devoleena Bhattacharjee criticized supporters of Umar Khalid and Sharjeel Imam after their bail rejection. She shared a controversial video, expressing outrage at those backing 'traitors,' citing radical ideologies.
Web Summary : देवोलीना भट्टाचार्जी ने उमर खालिद और शरजील इमाम की जमानत खारिज होने के बाद उनके समर्थकों की आलोचना की। उन्होंने एक विवादास्पद वीडियो साझा किया और 'गद्दारों' का समर्थन करने वालों पर कट्टर विचारधाराओं का हवाला देते हुए आक्रोश व्यक्त किया।