भारत -पाक तणावाच्या परिस्थितीत सध्या सगळेच चिंतेत आहेत. प्रत्येक देशवासीय भारतीय सैन्याचं मनोबळ वाढवत आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट करत सैन्याचं कौतुक करत आहेत. तसंच पाकिस्तान्यांना सडेतोड उत्तरं देत आहेत. टीव्हीवरील 'गोपी बहू' म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattacharjee) एका पाकिस्तानी युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती भारताला पाठिंबा देत एकामागोमाग एक ट्वीट करत आहे. दरम्यान एका पाकिस्तानी युजरने तिला उद्देशून लिहिले,'मी सर्व भारतीय निर्मात्यांना विनंती करतो की देवोलिना भट्टाचार्जीला काम द्या. घरी बसून ती वेडी झाली आहे. प्रत्येक वेळी ती नकारात्मकता पसरवत आहे. मला तिचा चाहता असल्याचा आता पश्चात्ताप होतोय. जर इस्लामबद्दल इतकाच तिरस्कार वाटतो तर आपल्या नवऱ्याला सोडत का नाही?"
युजरच्या या ट्वीटवर देवोलिना हसतच म्हणाली, "आता यांना मला काम मिळावं म्हणून काळजी आहे. ज्यांचा स्वत:चा आता काही भरोसा राहिलेला नाही. अरे आधी तुमचा देश आणि टेरर कॅम्प सांभाळा. २ दिवसातच तुमच्या सैन्यावर आंतरराष्ट्रीय फंड कडून भीक मागण्याची वेळ आली आहे. माझ्या नवऱ्याच्या काळजीत तुम्ही जीव नका जाळू. स्वत:च्या देशात जे दहशतवादी पाळले आहेत त्यांना भारताच्या ताब्यात द्या...बिचारे माझ्यामुळे परेशान आहेत."
देवोलिना भट्टाचार्जीने १४ डिसेंबर २०२२ रोजी जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न केलं. तर गेल्या वर्षी तिला १८ डिसेंब रोजी तिने मुलाला जन्म दिला.