टीव्ही कलाकारांमध्ये डेंग्यूची दहशत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 17:38 IST
डेंग्यू या आजारानं मुंबईकर हैराण झाले आहेत. टीव्ही जगतातील कलाकारही डेंग्यू या आजाराने त्रस्त आहेत. अभिनेता रवी दुबे आणि ...
टीव्ही कलाकारांमध्ये डेंग्यूची दहशत !
डेंग्यू या आजारानं मुंबईकर हैराण झाले आहेत. टीव्ही जगतातील कलाकारही डेंग्यू या आजाराने त्रस्त आहेत. अभिनेता रवी दुबे आणि अभिनेत्री सरगुण मेहता यांच्यापाठोपाठ आणखी एक टीव्ही कलाकार डेंग्यूनं आजारी पडलीय. छोट्या पडद्यावरील 'ब्रम्हराक्षस' या मालिकेतील नायिका किश्वर मर्चंट हिला डेंग्यू झाला आहे. खुद्द किश्वरनं डेंग्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून रुग्णालयात उपचार सुरु असल्याचंही सांगितले आहे. किश्वरचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सुयश रायनंही तिला डेंग्यू झाल्याचे सांगितले आहे. आम्ही तर किश्वरला एवढेच सांगू की गेट वेल सून.