Join us

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीची लगीन घाई, ५० व्या वाढदिवसाला घेऊ शकते सात फेरे

By गीतांजली | Updated: October 25, 2020 06:00 IST

अभिनेत्रीने लग्नाला घेऊन हिंट दिली आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री डेलनाज इराणी लवकर बॉयफ्रेंड पर्सी कडकडिसोबत सात फेरे घेऊ शकेत. अभिनेत्रीने लग्नाला घेऊन हिंट दिली आहे. डेलनाज म्हणाली मी 50व्या वाढदिवसाला पर्सीसोबत लग्न करु शकते. मात्र या गोष्टीची गॉरेंटी अभिनेत्रीला ही नाही आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार डेलनाज लग्नासाठी तयार आहे. डेलनाज म्हणाली, 'बाहेरचे लोक सोडा पण माझे नातेवाईकदेखील माझ्या लग्नाविषयी मला विचारतच असतात. कधी डेलू आत्याचे लग्न होणार ?, मी लग्न संस्थेच्या विरोधात नाही आहे. कोणत्याही मॅरेडी कपल प्रमाणेच मी आणि पर्सी एकमेकांसोबत राहतो. आमच्यासाठी लग्न म्हणजे कागदाचा एक तुकडा ज्यावर आम्ही सही करु.

डेलनाझ-पर्सी 8 वर्षांपासून आहेत रिलेशनशीपमध्ये पर्सीबद्दल बोलताना डेलनाज म्हणाली, ''मी आज पर्सीशिवाय लग्नाचा विचारसुद्धा करु शकत नाहीय. आम्ही जवळपास 8 वर्षे रिलेशनशीपमध्ये आहोत. माझ्यावर प्रेम करण्याबरोबरच तो माझी काळजी घेते, माझा आदर करते, जे एका स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आमचं नातं जसं आहे तसेच सुंदर आहे. पुढच्या वर्षी जर मला माझा 50वा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करायचा असले तर शक्यता आहे मी त्याचदिवशी लग्न करेन.'' पर्सी डेलनाजपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर टेलनाज टाटा स्कायवरील नवा शोमध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. हायजॅक हा एक थ्रीलर क्राईम शो आहे. ज्यात डेलनाज शिवानी सिंग नावाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. डेलनाज अलीकडे 'छोटी सरदारनी' शोमध्ये दिसली होती.  

टॅग्स :टिव्ही कलाकार