दीपिकाचे सामाजिक भान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 17:58 IST
दिया और बाती हम या मालिकेत संध्याची भूमिका साकारणाऱ्या दीपिका सिंगचे तिच्या अभिनयासाठी नेहमीच कौतुक केले जाते. या मालिकेमुळे ...
दीपिकाचे सामाजिक भान
दिया और बाती हम या मालिकेत संध्याची भूमिका साकारणाऱ्या दीपिका सिंगचे तिच्या अभिनयासाठी नेहमीच कौतुक केले जाते. या मालिकेमुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली आहे. तिच्या या प्रसिद्धीचा विचार करून भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा भाग होण्यासाठी तिची निवड करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभिनयानाच्या प्रोमोसाठी तिने नुकतेच चित्रीकरण केले. इतकी मोठी संधी मिळाल्यामुळे दिपिका स्वतःला भाग्यशाली समजते. मला ज्यावेळी स्वच्छ भारत अभिनयानाविषयी सांगण्यात आले, त्यावेळी माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी देशातील एक जागरुक नागरिक असल्याने मी नेहमीच चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत असते. यापुढे मी लोकांना परिसर स्वच्छ ठेवायला आणि स्वच्छता राखण्यास सतत आवाहन करेन असे दीपिका सांगते.