Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:00 IST

खऱ्या आयुष्यात रेश्मा खूप ग्लॅमरस आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने सर्वांचंच लक्ष वेधलं. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. याच विषयावर आधारीत ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील रेश्माच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. खऱ्या आयुष्यात रेश्मा खूप ग्लॅमरस आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 

रंग माझा वेगळा मालिकेबद्दल सांगायचं तर सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत एकीकडे तनुजा दीपाला कार्तिकपासून लांब करते आहे. त्यात दीपाने तिच्या आईच्या अपघाताचा सीन रिक्रिएट करून माईंची वाचा परत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात माईंची तब्येत खूप बिघडली आहे. त्यामुळे पुन्हा सौंदर्यावर दीपावर भडकली आहे.

त्यात तनुजा माईंना सर्व आठवत असल्यामुळे आणि दीपाची आई निर्दोष असल्यामुळे दीपाला सौंदर्याने स्वीकारले तर या भीतीने तनुजा माईना पायऱ्यांवरून खाली ढकलते. त्यावेळी तिथे दीपा उपस्थित असते. त्यामुळे त्याचाही आरोप दीपावर होता. आता सौंदर्या काय करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कलर्स मराठी वाहिनीवरील 'चाहूल' या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

मराठीसोबतच रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

टॅग्स :स्टार प्रवाह