Join us

​टीआरपी नसल्याने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 11:10 IST

नागार्जुन-एक योद्धा ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असले तरी टिआरपी रेसमध्ये या मालिकेला आपली जागा बनवता आलेली ...

नागार्जुन-एक योद्धा ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असले तरी टिआरपी रेसमध्ये या मालिकेला आपली जागा बनवता आलेली नाहीये. या मालिकेची संकल्पना ही सध्याच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकेल अशी निर्मात्यांना खात्री होती. पण या मालिकेला तितिकीशी प्रसिद्धी मिळवता आली नसल्याने एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचे वाहिनी आणि निर्मात्यांनी ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. अंशुमन मल्होत्रा नागार्जुन या मालिकेत प्रमुख भूमिका सााकारत आहे. पण अंशुमन नागार्जुन या भूमिकेला योग्य न्याय देत नसल्याने त्याने अभिनयात सुधारणा कराव्यात असे त्याला सांगण्यात आले होते. पण त्याच्या अभिनयात काहीही सुधारणा न झाल्याने नव्या नागार्जुनचा शोध निर्मात्यांनी सुरू केला असून पर्ल व्ही पुरी नवा नागार्जुन बनणार असल्याची चर्चा आहे. पर्लने याआधी मेरी सासू माँ या मालिकेत काम केले आहे.