Join us
Daily Top 2Weekly Top 5

देबोलीना बनली कॅलेंडर गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 20:25 IST

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली ‘गोपी बहु’ देबोलीना भट्टाचार्या सध्या अन्य सेलिब्रिटीजसोबत टेली कॅलेंडर-२०१७ साठी फोटोशूट करण्यात ...

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली ‘गोपी बहु’ देबोलीना भट्टाचार्या सध्या अन्य सेलिब्रिटीजसोबत टेली कॅलेंडर-२०१७ साठी फोटोशूट करण्यात दंग आहे.प्रत्येक वर्षी बालाजी टेलिफिल्म टीव्ही अ‍ॅक्टर्ससोबत कॅलेंडरसाठी फोटोशूट करीत असते. ज्यामध्ये टीव्हीवर साडीचोळीत दिसणारे कलाकार चक्क हॉट अंदाजात बघावयास मिळतात. देबोलीनाचा असाच काहीसा अंदाज या फोटोशूटनिमित्त बघावयास मिळाला. अतिशय हॉट अंदाजात तिने कॅमेºयात स्वत:च्या अदा कैद केल्या आहेत. देबोलिनाच्या या लुकला फेमस स्टायलिश रेहान शाह याने डिझाइन केले आहे. देबोलीनाने तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, तिच्या फॅन्सकडून यास तुफान लाइक्स मिळत आहेत. देबोलीनाचा हा हटके अंदाज तिच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅक्ट्रेसला धक्का देणारा ठरला नसेल तरच नवल...