Join us

'यह रिश्ता क्या कहलाता है!'मध्ये देबलिना चॅटर्जी महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 14:06 IST

स्टार प्लसवरील 'यह रिश्ता क्या कहलाता है!' या मालिकेत देबलिना चॅटर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे देबलिना झळकणार गयूच्या भूमिकेत

स्टार प्लसवरील 'यह रिश्ता क्या कहलाता है!' या मालिकेतील सर्वांची आवडती व्यक्तिरेखा गयू आता मालिकेत पुन्हा परतणार आहे. आतापर्यंत ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कांची सिंह या अभिनेत्रीच्या जागी आता रूपसुंदर अभिनेत्री देबलिना चॅटर्जी ही या भूमिकेत दिसणार आहे. 

'सजदा तेरे प्यार में' या मालिकेतील भूमिकेमुळे प्रसिद्धीस आलेली देबलिना आता काही काळाच्या खंडानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर गयूच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेची नायिका नायरा (शिवांगी जोशी) हिची चुलत बहीण असलेली गयू ही 'रिश्तों का उत्सव' या एका कौटुंबिक सोहळ्याद्वारे या मालिकेत प्रवेश करणार आहे.या मालिकेत प्रवेश होत असल्यामुळे आनंदित झालेल्या देबलिनाने सांगितले, 'दीर्घकाळ सुरू असूनही आजही लोकप्रिय राहिलेल्या यह रिश्ता क्या कहलाता है! या मालिकेत मला भूमिका साकारण्यास मिळत असल्यामुळे मी खूप आनंदात आहे. मी माझ्या कारकीर्दीस स्टार प्लस वाहिनीवरूनच प्रारंभ केला आणि आता दुसऱ्या मालिकेद्वारे पुन्हा या वाहिनीवर परतण्याचा आनंद वेगळाच आहे'. ती पुढे म्हणाली की, 'या मालिकेच्या एका अप्रतिम टीमबरोबर, विशेषत: राजन सरांबरोबर काम करण्यास मी अधीर झाले आहे कारण मी त्यांच्याबद्दल आणि या मालिकेबद्दल खूप काही ऐकून आहे. आता गयू ही नव्या अवतारात परतणार असून प्रेक्षकांना अनेक आनंदाचे धक्केही बसणार आहेत. या मालिकेत आता गयूची व्यक्तिरेखा महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून तिच्या व्यक्तिरेखेला नवे पदर देण्यात आले आहेत. यथावकाश ते उघड होतील. मी आता गयूच्या भूमिकेतून एका नव्या प्रवासाला प्रारंभ करीत असून या महत्त्वाच्या मालिकेत ही भूमिका असल्याने मला खूप महत्त्वाचे वाटत आहे.'आता स्टार प्लसवरील यह रिश्ता क्या कहलाता है! या मालिकेतील कार्तिक आणि नायरा यांच्या संबंधांना गयूमुळे कोणते नवे वळण लागणार आहे, ते पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्लस