'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सर्वांच्या आवडीची. या मालिकेने प्रेक्षकांंचं मन जिंकलं. आजही ही मालिका TRP च्या शिखरावर आहे. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलंय. या मालिकेतील जेठालालनंतर सर्वात गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे दयाबेन. दयाबेनची भूमिका साकारली अभिनेत्री दिशा वकानीने. गेली काही वर्ष दिशा या मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे दिशा या मालिकेत पुन्हा कमबॅक करणार का? यावर मालिकेचे निर्माते असित मोदींनी मौन सोडलंय.
दयाबेन परतणार का? असित मोदी म्हणाले
एका मुलाखतीत असित मोदींनी याविषयी खुलासा केला. असित मोदी म्हणाले की, "दयाबेनला शोमध्ये परत आणणं महत्वाचं आहे. कारण मला त्यांची खूप आठवण येते. कधीकधी परिस्थिती इतकी बदलते की, काही गोष्टी घडत नाहीत. किंवा काही गोष्टी घडायला उशीर होतो. अनेकदा गोष्टी लांबत जातात. दिशा वकानी सध्या दोन मुलांचा सांभाळ करण्यात व्यस्त आहेत. मी अजूनही खूप प्रयत्न करतोय. मला असं वाटतंय की दिशा वकानी आता पुन्हा शोमध्ये दिसू शकत नाही. तिला दोन मुलं आहेत."
असित मोदी याच मुलाखतीत पुढे म्हणाले, "दिशा माझ्या बहिणीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी आमचे चांगले संबंध आहेत. दिशा मला राखी बांधते. आम्ही १७ वर्ष एकत्र काम केल्याने आमचं कुटुंब विस्तारलं आहे. मला अजूनही वाटतं की, देवाने काहीतरी चमत्कार करावा आणि ती परत यावी. ती शोमध्ये परतली तर चांगलीच गोष्ट असेल. जर ती शोमध्ये कमबॅक करत नसेल तर मात्र मला दयाबेनसाठी नव्या अभिनेत्रीला शोधावं लागलं."