Join us

'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर दयाबेनची एंट्री, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 16:30 IST

2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. मात्र ती काय पुन्हा आलीच नाही. ती मालिकेत कमबॅक करु शकते अशा चर्चा सध्या रंगत आहेत.

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. त्यामुळे दोघांची एकत्र धमाल रसिकांना पाहायची जणू काही सवयच झाली. मात्र दोन वर्षांपासून रसिकांची लाडकी दया ही तारक मेहता का उल्टा चष्मामधून गायब आहे.

दिशा वकानी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळं दिशानं लोकप्रियतेचं शिखर गाठलं.आज तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा दया बेन या नावानंच अधिक ओळखळं जातं. सध्या ती तारक मेहतामध्ये झळकत नसली तरीही तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना रस असतो.

दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. मात्र ती काय पुन्हा आलीच नाही. ती मालिकेत कमबॅक करु शकते अशा चर्चा सध्या रंगत आहेत. यातच  काही दिवसांपूर्वी अचानक दिशा या मालिकेच्या सेटवर आली होती. तिला बघून सारेच प्रचंड खुश झाले.

यावेळी दया तिच्या सेटवरील कलाकार मित्रांना भेटायला आली होती. मुलीच्या जन्मानंतर ती कोणालाच भेटली नव्हती.मोठ्या ब्रेकनंतर वेळ काढून तिने सा-यांची भेट घेतली. सगळ्यांसह मनमोकळ्या गप्पा मारल्या.धम्माल मस्ती केली. तिला पाहून सा-यांनाच पुन्हा जुने दिवस आठवले. दया बेनला बघून काही वेळेसाठी सेटवर पुन्हा एकदा आधीप्रमाणेच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सगळ्यांना भेटून झाल्यानंतर घरी जायला निघाली तेव्हा मात्र सा-यांचेच डोळे पाणावले होते.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी