Join us
Daily Top 2Weekly Top 5

​चिडिया घरमध्ये गोमुख शिकणार मयुरीसाठी नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 17:13 IST

चिडियाघरमध्ये नेहमीच प्रेक्षकांचे वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन केले जाते. या कार्यक्रमातील मयुरी, गोमुख, गधाप्रसाद, बाबुजी, कोयल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या ...

चिडियाघरमध्ये नेहमीच प्रेक्षकांचे वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन केले जाते. या कार्यक्रमातील मयुरी, गोमुख, गधाप्रसाद, बाबुजी, कोयल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मयुरी नृत्याच्या प्रेमात पडली असून ती नृत्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता तिच्यासोबत गोमुख म्हणजेच सुमीत अरोरादेखील नृत्याचे धडे घेणार आहे. चिडियाघरमध्ये आता सगळे मिळून मयुरीचा म्हणजेच शफाक नाजचा वाढदिवस साजरा करणार आहेत. आणि त्यावेळी सगळेच नृत्य करून मजा मस्ती करणार आहेत. त्यावेळी मयुरी आपल्या पतीला म्हणजेच गोमुखला नाचण्यासाठी बोलवणार आहे. गोमुख स्वतःला एक चांगला डान्सर मानतो. पण त्याला नृत्य येत नसल्याने तो नाचताना मयुरीच्या पायावर पाय देणार आहे आणि यामुळे मयुरी सगळ्यांसमोर त्याला ओरडणार आहे. आणि यामुळे गोमुखला खूप वाईट वाटणार आहे. याच दरम्यान एका नृत्याच्या स्पर्धेची घोषणा होणार आहेत. त्यात नृत्यामध्ये पारंगत असलेला पपी म्हणजेच संजय चौधरी मयुरीसोबत भाग घेणार आहे. चिडियाघरमध्ये सतत जायला मिळेल केवळ या हेतूने पपीने नृत्य स्पर्धेत भाग घेतला आहे. कारण कोयलला म्हणजेच आदिती साजवनला तो आवडतो की नाही हे त्याला यातून जाणून घ्यायचे आहे. मयुरी आणि पपीला एकत्र नृत्य करताना पाहून गोमुखमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या नृत्याच्या तालमीत तो व्यत्यय आणून मयुरीशी खूप भांडणार आहे. मयुरीशी न भांडता गोमुखने गोमुखला नृत्य शिकण्याचा सल्ला बाबुजी त्याला देणार आहेत आणि यामुळे गोमुख केवळ नृत्यच शिकणार नाही तर तो त्याचा मेकओव्हरदेखील करणार आहे. गोमुखच्या या नव्या रूपात त्याला कोणीही ओळखणार नाहीये. तर दुसरीकडे मयुर आणि पपी अंतिम फेरीत पोहोचल्यावर पपीला दुखापत होणार आहे आणि गोमुखसोबत मयुरने नृत्य करावे असे तो तिला सांगणार आहे. त्यामुळे गोमुख आणि मयुरी नृत्य सादर करणार आहे. त्यांच्या नृत्याने परीक्षकदेखील खूश होणार आहेत. ते दोघे चांगले डान्सर नसले तरी त्यांची केमिस्ट्री खूप चांगले असल्याचे मत परीक्षक व्यक्त करणार आहेत. त्यानंतर गोमुख त्याची खरी ओळख मयुरी आणि सगळ्यांना सांगणार आहे आणि केवळ मयुरीच्या प्रेमासाठी त्याने नृत्य शिकल्याचीही कबुली देणार आहे.