Join us

'डान्स सीझन ३' मध्ये गोविंदाने डान्स करतेवेळी इतक्यावेळा घेतले रिटेक्सवर रिटेक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 15:18 IST

90च्या दशकात आपली अदाकारी आणि डान्सिंगनं  हिरो नंबर 1 आणि डान्सर नंबर  बनलेला गोविंदाने बॉलिवूडचा स्ट्रीट डान्सर नंबर 1 ...

90च्या दशकात आपली अदाकारी आणि डान्सिंगनं  हिरो नंबर 1 आणि डान्सर नंबर  बनलेला गोविंदाने बॉलिवूडचा स्ट्रीट डान्सर नंबर 1 म्हणूनही ख्याती मिळवली आहे. रूपेरी पडद्यावर आपल्या डान्सने रसिकांची पसंती मिळवलेला गोविंदा मात्र छोट्या पडद्यावर आपले डान्सिंग स्कील सादर करताना थोडे दडपण येते की अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.डान्स प्लस सीझन ३ या वेळेला एक लेव्हल अप आहे. डान्स प्लस सध्या आपल्या तिसऱ्या सीझनमध्ये असून निःशंकपणे आपल्या सर्व अपेक्षांवर खरा ठरलेला असून शोमधील मेंटॉर्स ते सुपरजज ते स्पर्धक आणि अगदी शोचा सूत्रधार राघव जुयाल याच्याही नसांनसांत डान्स भिनलेला आहे. ह्या शोसाठी सर्वोच्च ८ स्पर्धकांची निवड झाली असून यातील कलाकार आणि तंत्रज्ञ आता भारताचा पुढील डान्सिंग सेंसेशन शोधून काढण्यासाठी झटतील. निर्मात्यांनी ह्यावेळेस प्रत्येक भागामध्ये लिजंड्‌स ऑफ डान्सना निमंत्रित करण्याची संकल्पना सुरू केली असून ह्या वेळेस त्यांनी आपला पहिला डान्सिंग लिजंड म्हणून गोविंदा ला ह्या शोमध्ये निमंत्रित केले आहे. चीचीने त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत या स्पेशल भागात हजेरी लवातर रसिकांची भरघोस मनोरंजन केले.सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार गोविंदा प्रथम सुपरजज रेमो आणि सूत्रधार राघवसोबत आपला डान्स सादर केला.नेमके हे दोघे काय करतात याची इंतभूत माहिती गोविंदाने समजून घेतली.राघव मंचावर काय ट्रिक्स करतो हे जाणून घेतल्यानंतर मग मात्र गोविंदाला कुठल्याही स्क्रिप्टची गरज नव्हती. त्याने राघवसोबत दृश्यावर चर्चा केली आणि त्या दोघांमधील कॉमिक टायमिंग अचूक राहिल यांची योग्य खबरदारी घेतली. प्रत्येक ॲक्ट गिग परफॉर्मन्स मोठ्‌या पडद्यावर अगदी नीट दिसावा म्हणून गोविंदाने २-३ रिटेक्सही दिले. डान्स टीम स्पर्धक आणि कॅप्टन्स यांनी 'अंखियों से गोली मारे' आणि 'सोनी दे नखरे' अशा गोविंदाच्या सुपरहिट गाण्यांवर गोविंदाची वाहवा मिळवली.