Join us
Daily Top 2Weekly Top 5

दलजीत कौर देणार अभिनेत्री मंदाकिनीच्या लुकला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 10:49 IST

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दलजीत कौर अॅण्ड टीव्हीवरील विक्रम बेताल की रहस्य गाथा या परीकथेत एक नवीन भूमिका साकारताना दिसणार आहे.

ठळक मुद्दे दलजीत कौर दिसणार विक्रम बेताल की रहस्य गाथा मालिकेत

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दलजीत कौरने विविध भूमिका साकारून व आपल्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता ती अॅण्ड टीव्हीवरील विक्रम बेताल की रहस्य गाथा या परीकथेत एक नवीन भूमिका साकारणार आहे.

या पुराणकालीन संदर्भ असलेल्या मालिकेत अनेक नवीन भूमिका आहेत, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि त्यांची मने जिंकली आहेत. या मालिकेत दलजीत अनुसूयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेबद्दल वेताळ राजा विक्रमादित्यला सांगतो. ऋषीकन्या अनुसूया अत्री मुनींशी लग्न करते. अत्री ऋषी तिला वाट बघायला सांगून ज्ञानाच्या शोधात बाहेर पडतात. अनुसूया अनेक वर्षं त्यांची वाट पाहाते, वर्षांनुवर्षांनंतरही ती आशा सोडत नाही. पत्नीधर्म पाळण्याची तिची ईच्छा अतिशय तीव्र असते, ती पडताळून पाहण्यासाठी देव आश्रमात येतात आणि तिची भक्ती पाहून आश्चर्यचकित होतात. दलजीत कौरने या भूमिकेसाठी केलेला लुक पाहून गतकाळातील अभिनेत्री मंदाकिनी आठवते. राम तेरी गंगा मैली या सिनेमातील मंदाकिनी यांचा धबधब्यावरच्या सीनपासून तसे अनेक सीन तयार व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या त्या लूकची चर्चा इतकी झाली, की बॉलिवुडमधल्या अनेक अभिनेत्रींनी पुढे तसाच लूक करायला सुरुवात केली.दलजीत म्हणाली,मला या भूमिकेमुळे माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. या मालिकेचा भाग होता आले याबद्दल आणि नव्या भूमिकेबद्दल मी अतिशय उत्सुक आहे. विक्रम वेताळच्या गोष्टीला नवे रूप देऊन ही कथा समकालीन आउटलूकमध्ये सादर करण्यात आली आहे. अनुसूयाची माझी भूमिका जरा वेगळी आणि आनंददायी आहे. यासाठी मी मंदाकिनी स्टाइल पांढरी साडी वापरली आहे. मंदाकिनी यांनी या साडीत अनेक प्रेक्षकांची करमणूक केली. मात्र माझे अनुसूयाचं पात्र पतिव्रता स्त्रीचेआहे, पतीशी एकनिष्ठ असलेल्या या स्त्रीला पाहून देवही अचंबित झाले होते. त्यामुळे या भूमिकेत मंदाकिनीउभी करायची नाही. फक्त त्यांचा सुंदर लूक वापरण्यात आला आहे, त्यांनी ज्या प्रकारे हा लूक कॅरी केला होता. त्यामुळेच मलाही प्रेरणा मिळाली आहे. प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल आणि ते मला स्वीकारतील अशी आशा वाटते. ’’ 

टॅग्स :विक्रम बेताल