Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावरील हा अभिनेता ५१ व्या वर्षी झाला डॅडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 18:02 IST

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून घराघरात पोहचलेला अभिनेता ५१ व्या वर्षी बाबा झाला आहे

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून घराघरात पोहचलेला अभिनेता सूरज थापर वयाच्या ५१व्या वर्षी पुत्र प्राप्ती झाली आहे. त्याची पत्नी दीप्ती हिने गुढी पाडव्याच्या दिवशी मुलाला जन्म दिला आहे. 

अभिनेता सूरज थापरची पत्नी म्हणजेच अभिनेत्री दीप्ती ध्यानी हिने गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच ६ एप्रिलला मुलाला जन्म दिला आहे. या दोघांना पाच वर्षांचा मुलगा आहे ज्याचे नाव विश्वम आहे. आता त्यांच्या घरी आणखीन एक मुलगा दाखल झाला आहे. त्यामुळे दीप्ती व सूरज दोघेही खूप खूश आहेत. याबाबत सूरज म्हणाला की, आम्हाला मुलगी व्हावी, अशी दीप्तीची इच्छा होती. मुलगा जन्माला आल्यानंतरही तिने अनेक वेळा नर्सला मुलगी असेल जरा पुन्हा तपासून पहा, असे सांगितले. हे ऐकून मला खूप हसू येच होते. आम्हाला वाटले होते की आम्हाला मुलगीच होईल. तिच्यासाठी आम्ही नावे देखील ठरवली होती. पण, आता मुलासाठी नाव शोधावे लागेल. मुलगी झाली असती तर आमचे कुटुंब पूर्ण झाले असते.

'ससुराल गेंदा फूल', 'रजिया सुल्तान', 'चंद्रगुप्त मौर्य' अशा मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता सूरजने दीप्तीसोबत २०१२ साली लग्न केले.

सुरजचे हे दुसरे लग्न असून २००३ साली त्याने रोमा नवामीशी लग्न केले होते. त्या दोघांची अंगार चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. पाच वर्षे डेट केल्यानंतर ते विवाहबंधनात अडकले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. तीन वर्षांनंतर ते विभक्त झाले. त्यानंतर रोमा आपल्या आई वडिलांसमवेत राहू लागली आणि सूरजने काही कालावधीनंतर दुसरे लग्न केले.