Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दार उघड बये’ मलिकेतील मुक्ता सारंगच्या लग्नासाठी महिलांनी घातलं देवीला साकडं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 17:00 IST

मुक्ताला सारंगपर्यंत पोहोचू न देण्यासाठी रावसाहेब हरतह्रेची खेळी खेळतायत, यासाठी त्यांनी मुक्ताला एका खोलीत डांबून ठेवलंय तसंच तिच्या घरच्यांना पण भैरू त्रास देतोय.

 'दार उघड बये' चा ५ फेब्रुवारीला १ तासाचा ऍक्शन पॅक भाग प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटतेय, त्यासोबतच आपला संसार वाचवण्यासाठी देखील तिचा संघर्ष सुरु आहे. मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. 

मुक्ताला सारंगपर्यंत पोहोचू न देण्यासाठी रावसाहेब हरतह्रेची खेळी खेळतायत, यासाठी त्यांनी मुक्ताला एका खोलीत डांबून ठेवलंय तसंच तिच्या घरच्यांना पण भैरू त्रास देतोय. रावसाहेब नगरकरांनी खोटेपणाने मुक्ताला डांबून ठेवलं असलं तरी संबळाच्या मदतीने ती त्या बंदीवासातून सुटलीये. पण आता लग्नाच्या मुहूर्तापर्यंत आपली मुक्ता नगरकर वाड्यात पोहोचावी आणि तिचं आणि सारंगच लग्न व्हावं यासाठी उपस्थित महिलांनी संबळ वाजवून आणि देवीचा गोंधळ घालून देवी आईला साकडं घातलं.  

महाराष्ट्रार्तील तमाम महिलांचे आशीर्वाद मुक्ता सोबत आहेतच, त्यामुळे सर्व कठीण प्रसंगांना तोंड देऊन मुक्ता सारंग पर्यंत पोहोचणार हे नक्की. पण सगळे अडथळे पार करून मुक्ता लग्नाला कशी पोहोचेल हे बघण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

टॅग्स :झी मराठी