Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिस्टल डिसूझा दिसणार नव्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:21 IST

बेलनवाली बहुमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत क्रिस्टल डिसूझा दिसणार आहे. टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय क्रिस्टल या शो मध्ये कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. ...

बेलनवाली बहुमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत क्रिस्टल डिसूझा दिसणार आहे. टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय क्रिस्टल या शो मध्ये कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. कारण ती रुपा अवस्थी, ही बहूची भूमिका करत आहे तर लेखक व निर्माते, अभिनेते धीरज सरना प्रमुख भूमिका करणार आहेत- तिच्या मृत पतीच्या भूताची, अमरनाथची भूमिका.बेलनवाली बहू मध्ये वेंधळ्या पण प्रेमळ पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा म्हणाली, “माझे पात्र असलेल्या रुपा प्रणाणेच मी वास्तविक जीवनात आहे, बरेचजण मला अत्याधुनिक मुलगी समजतात जी नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी अगदी सज्ज असते, पण माझी खरी विक्षिप्त बाजू त्यांना माहित नाही आणि त्यांची मला कधी पाहिलेले नाही. बेलनवाली बहू मधून मला माझा अभिनयाचा पराक्रम गंभीर भूमिकांच्या पलीकडे नेता आला आहे आणि विनोदी प्रकार हाताळता आला आहे. आता पर्यंत हा खूपच आश्चर्य़कारक अनुभव आहे आणि हे काम करण्याचा मी प्रत्येक दिवशी आनंद घेत आहे, जो आता एका गंभीर व्यवसायात बदलला आहे!  धीरज सरना, सुधीर पांडे, भावना बलसावर आणि देवेन भोजवानी सारख्या नामवंतां सोबत काम करायला मिळत आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते आहे आणि मला त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिळेल. ही संकल्पना कादंबरी आहे आणि  मला आशा आहे की माझे चाहते आणि प्रेक्षक माझ्या या नव्या अवताराची प्रशंसा करतील.”शो आणि त्याच्या पात्रा विषयी बोलताना, अभिनेता, लेखक आणि निर्माते धीरज सरना म्हणाले, “लेखन ही माझी नेहमीच आवड राहिली आहे. जेव्हा मी अमरनाथचे पात्र लिहीत होतो तेव्हा ते काहीसे माझ्यातून निर्माण होत गेले. जरी आम्ही अनेक अभिनेत्यांच्या ऑडिशन घेतल्या असल्या तरी मला कळून चुकले की कोणीही ही भूमिका चांगली साकारू शकणार नाही कारण ती माझ्या डोक्यात पक्की बसली होती. आणि नशीबाने माझ्या टीमने सुध्दा माझी समजूत घातली की मलाच ती भूमिका स्वतः केली पाहिजे. अमरनाथ हा नेहमीचा रोमँटिक हिरो नाही किंवा पुरुषी अहंकार असलेला पती नाही., तो एक साधा माणूस आहे ज्याला कधीही शांतता मिळाली नाही आणि तो सतत निराश असे. या शोची कथा विलक्षण आहे आणि त्यात असणाऱ्या सर्व पात्रांची केमिस्ट३ प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करणार आहे.”असे म्हणतात की, लग्न झाल्यावर मुलीचे आयुष्य बदलून जाते पण या वैशिष्ट्यपूर्ण कथेत मात्र या मुलीच्या पतीचे निधन झाल्यावर तिचा पती भूत बनतो आणि नंतर तिचे आयुष्य एक कलाटणीने बदलते हे दाखविले आहे. क्रिस्टल डिसूझा आणि धीरज सरना प्रमुख भूमिका करत आहेत आणि त्यांच्या सोबत प्रमुख भूमिकेत आहेत निष्णात खंदे विनोदवीर, जसे की सुधीर पांडे, भावना बलसार, मुस्ताक खान, सिकंदर खरबंदा, पारीजात, श्रध्दा जयस्वाल आणि सुनयना फौजदार.