Join us
Daily Top 2Weekly Top 5

आचल खुराणा मृत्यूच्या दाढेतून परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 15:47 IST

रोडीज या कार्यक्रमाची विजेती असलेली आचल खुराणा नुकतीच मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. आचलने सपने सुहाने लडकपन के, मेरी सासू ...

रोडीज या कार्यक्रमाची विजेती असलेली आचल खुराणा नुकतीच मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. आचलने सपने सुहाने लडकपन के, मेरी सासू माँ, सरोजीनी यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तिला काही दिवसांपूर्वी गुदमरल्यासारखे वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिचा रक्तदाबही प्रचंड वाढला होता. तो जवळजवळ 180-190च्या घरात होता. तिला प्रचंड उलट्याही होत होत्या. तिची ही अवस्था पाहून तिच्या घरातले सगळेच घाबरले होते. तिचे आई-वडील तर रडायला लागले होते. पण तात्काळ उपचार केल्याने तिची तब्येत आता सुधारत आहे. तिला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आचल ही केवळ 26 वर्षांची आहे. मी त्यावेळात माझ्या कुटुंबियासोबत होती ही गोष्ट सर्वात चांगली होती असे आचल सांगते.