Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आईसोबत हॉस्पिटलमध्ये स्पॉट झाली हिना खान, चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 17:04 IST

हिनाला हॉस्पिटलच्या बाहेर पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत

कोरोना व्हायरसमुळे देशात सुरू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानचा एक फोटो समोर आला आहे जो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. नुकतेच क्वारंंटाईन झालेली हिना खान हॉस्पिटल बाहेर दिसली. तिने व तिच्या आईने चेहऱ्याला मास्क लावलेला पहायला मिळाले. हिनाला हॉस्पिटलच्या बाहेर पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत आणि तिच्या आईच्या तब्येतीसाठी चिंतेत आहेत.

समोर आलेला हॉस्पिटलमधील हिनाचा फोटो तिनेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो खूप व्हायरल झाला.

तिने या पोस्टमध्ये सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये तिच्या आईचे खांदे दुखत आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे तिने स्वतःचाही चेकअप करून घेतले. हिनाने सांगितले की, या लॉकडाउनमध्ये घरातून बाहेर पडणे तितके सोप्पे नाही.

हिना खानने यापूर्वी एका स्केचच्या माध्यमातून भारतातील सध्याच्या लॉकडाउन स्थितीचं वर्णन केले होते. तिने भारताचा नकाशा काढला आणि त्यावर एक मोठे कुलूप लावले आहे. 

टॅग्स :हिना खानकोरोना वायरस बातम्या