Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 12:37 IST

बडे दूर से आए है या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच लग्न पाहायला मिळणार आहे. आना-शरद आणि सोनाचांदी-समर यांचे एकाच मंडपात ...

बडे दूर से आए है या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच लग्न पाहायला मिळणार आहे. आना-शरद आणि सोनाचांदी-समर यांचे एकाच मंडपात लग्न होणार आहे. पण घोटाला कुटुंब हे एलियन असल्याने त्यांचे कोणीही नातेवाईक पृथ्वीवर नाहीयेत. त्यामुळे लग्नाला नातेवाईकांची गर्दी करण्याासाठी हेमंत आपली शक्ती वापरून लोकांची निर्मिती करणार आहे. पण त्याने त्याच्या शक्तीने बनवलेले लोक दोन तासात अदृश्य होणार आहेत. त्यामुळे त्यांना लग्न लवकरात लवकर आटपायचे आहे. पण या सगळ्यात दौलत रामला लक्ष्मी ही त्यांची एक नातेवाईक आवडणार आहे. ते लक्ष्मीला लग्नाची मागणीही घालणार आहे. लक्ष्मीची व्यक्तिरेखा डिलनाझ श्रॉफ साकारणार आहे. लक्ष्मी दोन तासात अदृश्य झाल्याने वसंत घोटाला लक्ष्मीचे रूप घेणार आहे. वसंतचे पुढे काय होते हे पाहाणे नक्कीच मजेशीर असेल.