Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाच नाटकांचा संगम... ‘कुछ मीठा हो जाए’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:06 IST

चार कवींच्या चार कवितांवर आधारित चार कथानक आणि त्यांना दिग्दर्शित करणारे चार दिग्दर्शक असा आगळा वेगळा प्रयोग करून ‘बायोस्कोप’ ...

चार कवींच्या चार कवितांवर आधारित चार कथानक आणि त्यांना दिग्दर्शित करणारे चार दिग्दर्शक असा आगळा वेगळा प्रयोग करून ‘बायोस्कोप’ या मराठी चित्रपटाचा प्रयोग करण्यात आला होेता. याच पावलावर पाऊल ठेऊन मराठी रंगभूमीवरही एक असाच प्रयोग होत आहे. पाच लेखकांनी लिहिलेल्या पाच कथानकांवर आधारित, पाच वेगवेगळ्या नाटकांच्या तुकड्यांनी मिळून बनलेले ‘कुछ मीठा हो जाए’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर अवतरत आहे. गणेश पंडित, अभिजीत गुरू, शिरीष लाटकर, अंबर हडप आणि आशिष पाथरे ही नाटक, मालिका व लेखनात रमणारी मंडळी या आगळ्या वेगळ्या प्रयोगाद्वारे एकत्र आली आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन गणेश पंडित यांनी केले आहे. ‘एकच सूत्र घेऊन आम्ही पाच लेखकांनी केलेलं हे नाटक आहे.असं काही तरी करू या, असा विचार करून सर्वांनीच ते लिहायला घेतलं. त्यानंतर त्यात अजून काही चांगलं देता येईल, क थेत काही बदल करता येईल का, असा विचार विनिमय करून हे नाटक तयार झालय. असे गणेश पंडित सांगतात. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरु शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.