Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirmed! ​कविता कौशिक अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 17:20 IST

एफआयआर फेम दबंग पोलीस अधिकारी चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिकच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. कविता येत्या 27ला ...

एफआयआर फेम दबंग पोलीस अधिकारी चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिकच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. कविता येत्या 27ला लग्न करत आहे. तिच्या लग्नाची बातमी कळल्यानंतर खरे तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ती तिचा जवळचा मित्र रोनित बिस्वाससोबत लग्नबंधनात अडकत आहे. तिने ही बातमी स्वतःच मीडियाला दिली आहे. ती सांगते, "सगळ्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे एक खूपच चांगली बातमी आहे. मी मिसेस. बिस्वास म्हणून माझ्या नव्या आयुष्याला लवकरच सुरुवात करl आहे. मी केवळ दोनच दिवसांपूर्वी हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही केदारनाथमधील शिव-पार्वती मंदिरात जाऊन अतिशय साधेपणाने लग्न करणार आहोत. आम्ही लग्नाच्या पत्रिका छापल्या नाही आहेत की कोणाला जास्त बोलावलेदेखील नाही. हिमालयात वातावरण सध्या चांगलेच थंड आहे. तिथे बर्फ पडत असल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे सगळ्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना लग्नासाठी तिथे घेऊन जाणे शक्य नाहीये. त्यामुळे केवळ आम्ही 15 जणच लग्नासाठी जाणार आहोत. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असावेत ही एकच इच्छा आहे. 23 आणि 24 जानेवारीला हळद आणि मेंहदीचा कार्यक्रम माझ्या घरीच होणार आहे." कविताचे अभिनेता नवाब शहा याच्यासोबत पाच वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी संगनमताने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. कविता आणि नवाब यांना लग्न करायचे होते. पण कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिला होता. त्या दोघांचा धर्म वेगवेगळा असल्याने कविताच्या पालकांनी लग्नाला नकार दिला असल्याची चर्चा होती. आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करायचे नसल्याने तिने ब्रेकअपचा निर्णय घेतला होता.