Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirm 'द वॉइस इंडिया' ग्रँड फिनालेचे सूत्रसंचालन जय भानुशाली करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 13:20 IST

मालिका असो किंवा रिअॅलिटी शो टीव्ही कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा कलाकारांची काही ना काही कारणांमुळे रिप्लेसमेंट करण्यात येत असते.रिअॅलिटी शोमध्ये शेवटच्या ...

मालिका असो किंवा रिअॅलिटी शो टीव्ही कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा कलाकारांची काही ना काही कारणांमुळे रिप्लेसमेंट करण्यात येत असते.रिअॅलिटी शोमध्ये शेवटच्या क्षणी करण्यात येणारे बदलामुळे अनेकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.'द वॉईस इंडिया'चे सूत्रसंचालन करत असलेली सुगंधा मिश्रा शोच्या ग्रँड फिनालेला उपस्थित राहणार नाही.शोच्या निर्मात्यांनी शो एक आठवड्याने लांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुगंधा या ग्रँडफिनालेला वेळ देवू शकणार नाही. या शोच्या वेळेत अचानक बदल करण्यात आले. आणि दुसरीकडे आधीपासूनच सुगंधाचे इतर कार्यक्रम निश्चित असल्यामुळे निर्मात्यांनी सुगंधाच्या जागी जय भानुशालीला घेतले असल्याचे कळतंय.मुंबईत होणा-या ग्रँडफिनालेच्याच दिवशी  सुगंधा ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या लाईव्ह शोमध्ये सहभागी होणार असल्यामुळे निर्मात्यांनाही सुगंधाच्या जागी जय भानुशालीला सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी सोपावी लागली.दोन्हीही कार्यक्रम एकाच दिवशी आल्यामुळे सुगंधाला वॉईसच्या ग्रँड फिनालेला नकार द्यावा लागला. म्हणूनच तिच्याकडे फिनालेला अनुपस्थित राहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.सुगंधाही चांगली संधी स्विकारू शकत नसली तरीही जय भानुशाली या निमित्ताने 'द वॉईस ऑफ इंडिया' शोमध्ये कमबॅक  करत असल्यामुळे सध्या तो खूप आनंदीत आहे.याविषयी सुगंधा म्हणाली इतके दिवस मी या शोशी जोडले गेले होते.अखेरच्या भागाचे मी सूत्रसंचालन करू शकणार नाही. या गोष्टीची खंत मला वाटतेय. मात्र स्पर्धकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांना वेळात वेळ काढून भेटणार आहे.  खरेतर आधी या ग्रँडफिनालेच शूटिंग 5 मार्चला होणार होते.मात्र काही कारणांमुळे हे शूट आता 12 मार्चला होणार असल्यामुळे मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे सुगंधा म्हणाली. ALSO READ:जाणून घ्या 'द व्हाईस वॉईस सीझन 2'च्या मंचावर कंगना राणौतने का मारली सुगंधाच्या श्रीमुखात