Join us

Confirm:या तारखेला रुबीना दिलाइक बॉयफ्रेंड अभिनव शुक्लासह अडकणार विवाहबंधनात,या ठिकाणी होणार Destination wedding

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:31 IST

लवकरच पुन्हा एकदा लग्नाचा मौसम सुरु होणार आहे.गेल्या वर्षी अनेक टीव्ही अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत.आता टीव्ही अभिनेत्री आणि ...

लवकरच पुन्हा एकदा लग्नाचा मौसम सुरु होणार आहे.गेल्या वर्षी अनेक टीव्ही अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत.आता टीव्ही अभिनेत्री आणि किन्नर बहु म्हणून लोकप्रिय असलेली रुबीना दिलाइक अखेर लग्न करते आहे.रुबीना 21 जून रोजी शिमलामध्ये लग्न करतेय.बॉयफ्रेंड अभिनव शुक्लासह ती विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे.ब-याच दिवसांपासून रूबीना आणि अभिनव कधी लग्न करणार हा प्रश्न वारंवार रूबीनाला विचारला जात होता. यावर दोघांनीही मौनच बाळगले होते.आता तो क्षण आला आणि अखेर दोघांनीही लग्न करणार असल्याचे आपल्या चाहत्यांना सोशल मी़डियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज दिली आहे.आता दोघेही लग्नाची तयारी करण्यात बिझी आहे.शिमलामध्ये लग्न होणार म्हटल्यावर अगदी जवळच्या मित्रांनाच लग्नसोहळ्याचे आमंत्रण देण्यात आल्याचे कळतंय.रूबीना आणि अभिनव  दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हेच प्रेम ते या ना त्या पद्धतीने व्यक्त करत असतात.सोशल मीडियावर खुद्द अभिनवने रूबीनाचे क्लिक केलेले फोटो पाहून दोघांचाही रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळते.दोघांनीही आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे ठरवले आहे. यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे प्लॅनिंगही करण्यात आले आहे.लग्न म्हटले की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ते म्हणजे लग्न पत्रिका.रूबीनाची लग्न पत्रिकाही खूप हटके आहे.या लग्न पत्रिकेचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. लग्नपत्रिकेसह रोपटे देण्याची कल्पना रुबीनाने सुचवली आहे.या रोपट्याची विशेषता म्हणजे या रोपट्याला आठवड्यातून फक्त एकदा पाणी देण्याची गरज असते. या रोपाचे आयुष्य दिर्घ असते. लग्नपत्रिका पाहून त्याचे चाहते, मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु आहे.तर दुसरीकडे या ही लग्न पत्रिका पाहून अनेकांनी विराट-अनुष्काच्या लग्न पत्रिका सारखीच असल्याचे कमेंट करत आहेत.कलर आणि डिजाइन खूप मिळते जुळेत असल्याचे अनेकांना वाटत आहे. रूबीनाच्या लग्नानंतर आणखी कोण लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यातही अनेकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.तुर्तास सर्वसामान्याप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.