@kamat_umesh@spruhashirish@DWBHNatak.. Congratulations fr 50th successful shows.. Here is poem made by me fr u..
डोंण्ट व्हरी बी हॅपीचे सुवर्ण महोत्सव पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 11:56 IST
स्पृहा जोशी आणि उमेश कामत ही आॅन स्क्रिन जोडीचे डोण्ड बी हॅपी या नाटकाची चर्चा गेली कित्येक दिवस झाले ...
डोंण्ट व्हरी बी हॅपीचे सुवर्ण महोत्सव पूर्ण
स्पृहा जोशी आणि उमेश कामत ही आॅन स्क्रिन जोडीचे डोण्ड बी हॅपी या नाटकाची चर्चा गेली कित्येक दिवस झाले रंगत आहे. तसेच या नाटकाचे प्रयोगदेखील महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाले असून प्रेक्षकांनी देखील या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच या लोकप्रिय जोडीच्या या नाटकाचे ५० प्रयोग पूर्ण झाले आहे. यासाठी कित्येक मराठी सेलिब्रेटींनी व त्यांच्या चाहत्यांनी या नाटकाच्या प्रयोगाच्या सुवर्ण महोत्सवासाठी सोशलमिडीयावर शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर काही डाय हार्ट चाहत्यांनी चक्क, सुंदर कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मिहीर राजदा लिखीत या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केलं आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित या नाटकाच्या निमित्ताने स्पृहा- उमेश जोडीची केमिस्ट्री पुन्हा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चला तर, या नाटकाच्यासुवर्ण महोत्सववी प्रयोगासाठी लोकमत सीएनएक्सच्यावतीने देखील शुभेच्छा.