गणपती बाप्पा मोरया या मालिकेचे २०० एपिसोड पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 16:55 IST
कलर्स मराठी वाहिनीवरील गणपती बाप्पा मोरया या पौराणिक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नुकत्याच या मालिकेने २०० एपिसोड्सचा टप्पा ...
गणपती बाप्पा मोरया या मालिकेचे २०० एपिसोड पूर्ण
कलर्स मराठी वाहिनीवरील गणपती बाप्पा मोरया या पौराणिक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नुकत्याच या मालिकेने २०० एपिसोड्सचा टप्पा पार केला आहे. गणपती बाप्पा मोरया ही मालिका मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक जबरदस्त हायटेक मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांची वेशभूषा, कथेनुसार इफेक्टचा करण्यात येणारा वापर यांवर जास्त लक्ष देण्यात आले आहे. तसेच गणपत्ती बाप्पाच्या लोभसवाण्या रूपाने प्रेक्षकांना भारावून टाकलंय. २०० एपिसोड पूर्ण करुन या मालिकेने प्रेक्षकांचे या मालिकेप्रती असलेलं प्रेम सिध्द करुन दाखवलं आहे. शंकर, पार्वती आणि गणपती बाप्पा यांच्याभोवती मालिकेचं कथानक उलगडतं जातं आणि प्रेक्षकांना त्यांच्याविषयी अधिकची माहिती मिळते.