Join us

​द कपिल शर्मा शोचे 100 भाग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 12:41 IST

कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांचा नव्हे तर सेलिब्रेटींचादेखील ...

कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांचा नव्हे तर सेलिब्रेटींचादेखील आवडता कार्यक्रम बनला होता. पण कपिल शर्माचा कलर्स या वाहिनीच्या मंडळींसोबत वाद झाल्याने या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कपिलचा कार्यक्रम बंद झाल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. पण त्यानंतर या कार्यक्रमाची संपूर्ण टीम घेऊन कपिलने सोनी वाहिनीवर द कपिल शर्मा शो सुरू केला आणि या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी तर कलाकारांचा हा आवडता कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमाने नुकतेच 100 भाग पूर्ण केले आहेत. द कपिल शर्मा हा कार्यक्रम गेल्या कित्येक दिवसापासून चांगल्या गोष्टींसाठी नव्हे वादांसाठी चर्चेत आहे. कपिलने काही दिवसांपूर्वी एका शोवरून मुंबईला परतत असताना विमानात सुनील ग्रोव्हरला शिव्या घातल्या आणि चप्पलेने चोपले. तसेच या कार्यक्रमातील अली अजगर, चंदन प्रभाकर यांना त्याने वाईट शब्दांत सुनावले असे म्हटले जात आहे. या कारणामुळे सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर गेल्या कित्येक आठवड्यापासून चित्रीकरण करत नाहीये. त्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी चांगलाच ढासळत चालला आहे. पण तरीही या कार्यक्रमाचा टिआरपी वाढवण्याचा कपिल आणि त्याची टीम प्रयत्न करत आहे.द कपिल शर्मा शोचे 100 भाग पूर्ण झाल्याबद्दल कपिल, सुमोना चक्रवर्ती आणि किकू शारदा यांनी केक कापून आनंद साजरा केला. केक कापल्यानंतर या सगळ्यांनी डान्सदेखील केला. या भागासाठी खास भारतीय महिला क्रिकेट संघातील मंडळींना बोलावण्यात आले होते.