भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं आणि पाकिस्तान चांगलाच बिथरला. पाकिस्तानने भारतावर काल ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय सेनेने हा हल्ला परतवून लावला. अशातच अनेक कलाकारांचं कुटुंब सध्या जम्मू-काश्मीरला असून या कलाकारांनी कुटुंबाबद्दल काळजी व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. अशातच कॉमेडिनयन सयम रैनाचे (samay raina) बाबा सध्या जम्मूमध्ये असून समयने वडिलांविषयी काळजी प्रकट करणारी पोस्ट लिहिली आहे.
समय रैनाने वडिलांविषयी व्यक्त केली काळजी
समय रैनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिलंय की, "माझ्या बाबांनी रात्री काल मला दिवसभरात शेवटचा फोन केला. त्यांनी मला शुभ रात्री म्हणण्यासाठी फोन केला. त्यांचा स्थिर आणि शांत आवाज ऐकून मला शांत झोप लागली. याशिवाय कोणतीही काळजी करु नये, असंही त्या आवाजातून मला समजलं. भारतीय सशस्त्र दलामुळे सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यांचा शांत आवाज ऐकून माझ्या डोक्यातले विचारही शांत झाले. आपल्या सुरक्षेसाठी जे बॉर्डरवर बलिदान करतात त्यांच्या कुटुंबासाठी माझ्या मनात नितांत आदर आहे. जय हिंद"
भारत - पाकिस्तान तणाव
समय रैनाप्रमाणे 'ये हे मोहब्बते' मालिकेतील अभिनेता अली गोनीचे कुटुंबही जम्मू-काश्मीरला असल्याने त्याने चिंता व्यक्त केली आहे. भारत-पाकिस्तान युद्धाची लेटेस्ट अपडेट द्यायची झाली तर, या युद्धजन्य परिस्थितीत आगामी IPL क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. IPL चे १६ सामने बाकी होते. पण तूर्तास अनिश्चित काळासाठी हे स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय BCCI ने घेतला आहे.