कॉमेडियन भारती हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 18:06 IST
कॉमेडी नाईटस लाईव्ह, कॉमेडी नाईटस बचाओ, इंडियाज गॉट टायलेंट यांसारख्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडियन भारती सिंगला हॉस्पिटलमध्ये दाखल ...
कॉमेडियन भारती हॉस्पिटलमध्ये
कॉमेडी नाईटस लाईव्ह, कॉमेडी नाईटस बचाओ, इंडियाज गॉट टायलेंट यांसारख्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडियन भारती सिंगला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने भारतीला सोमवारी मुंबईतील संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून भारती हॉस्पिटलमध्ये आहे. तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितलेले आहे. तब्येत बरी झाल्यानंतर लवकरच भारती चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.